Home वर्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सज्ज

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सज्ज

134

हिंगणघाट येथे आढावा बैठक उत्साहात संपन्न — इच्छुक उमेदवारांनी १० नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करावेत : जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले

हिंगणघाट :

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने हिंगणघाट येथे भव्य आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले होते.

प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ नेते सुनिल राऊत, माजी नगराध्यक्ष बबन हिंगणेकर, तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, सहकार नेते वासुदेव गौळकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, सुधाकर खेडकर, विनोद वानखेडे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, सचिव श्रीकांत भगत, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी बैठकीदरम्यान पक्षाच्या आगामी निवडणुकीच्या रणनीती, बूथस्तरीय संघटन, मतदार नोंदणी व जनसंपर्क अभियान यावर चर्चा केली. त्यांनी इच्छुक उमेदवारांना १० नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले.

“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्ष सज्ज असून युवक व महिलांचा सहभाग वाढविण्यावर भर राहील. कार्यकर्त्यांनी पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचवावी,” असे वांदिले म्हणाले.

बैठकीदरम्यान हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत घवघवे यांनी मानले.

या वेळी हिंगणघाट तालुका अध्यक्ष मिलिंद कोपुलवार, शहराध्यक्ष बालू वानखेडे, सिंदी रेल्वे शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, समाजसेवक सुनिल डोंगरे, माजी गटनेता आशिष देवतळे, तसेच विविध पदाधिकारी, महिला व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.