Home Breaking News सालोड (हि.) येथे महिला शेतकऱ्यांचा गौरव; २५ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

सालोड (हि.) येथे महिला शेतकऱ्यांचा गौरव; २५ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

86

वर्धा | प्रतिनिधी : तुषार रेड्डीवार

आमदार दत्तक ग्राम सालोड (हि.), ता. जि. वर्धा येथे “आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष” निमित्त शेतकरी महिलांचा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने पार पडला. या कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या शेती क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची दखल घेण्यात आली.

शेती क्षेत्रात महिलांनी दाखवलेली जिद्द, मेहनत आणि आत्मनिर्भरतेची वाटचाल ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी ठरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

याच वेळी सुमारे २५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजनही संपन्न झाले. यामध्ये गोट मार्केट यार्ड, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपप्रादेशिक कार्यालय तसेच इतर पायाभूत सुविधांच्या उभारणीचा समावेश आहे. या विकासकामांमुळे स्थानिक नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून आरोग्य, व्यापार व प्रशासनिक सेवा अधिक सक्षम होणार आहेत.

या सर्व कामांचे भूमिपूजन  पंकजा मुंडे (मंत्री, पर्यावरण व वातावरणीय बदल व पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनातून महिला सशक्तीकरण आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असल्याचा संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमास माजी खासदार  रामदासजी तडस, आमदार राजेशजी बकाने, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

या उपक्रमामुळे विकासाची गती वाढण्याबरोबरच महिला शेतकऱ्यांचा आत्मविश्वास अधिक बळकट होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अशा उपक्रमांना विशेष महत्त्व असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले