Home Breaking News अवैध दारू तस्करी करणाऱ्यांवर देवळी पोलिसांची धडक कारवाई

अवैध दारू तस्करी करणाऱ्यांवर देवळी पोलिसांची धडक कारवाई

142

६.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त — तीन आरोपींवर गुन्हा दाखल

वर्धा :–

दारूबंदी जिल्ह्यात शेजारच्या यवतमाळ जिल्ह्यातून अवैध दारूची तस्करी होत असल्याची विश्वसनीय माहिती देवळी पोलिसांना मिळाल्यानंतर, पोलिसांनी तात्काळ नाकेबंदी करून मोठी कारवाई केली.

देवळी शहरालगत माऊली पार्कजवळील रिंग रोडवर नाकेबंदी दरम्यान, हिरा निळकंठ कोहचाडे (रा. कळम, जि. यवतमाळ) हा मारुती स्विफ्ट कार (क्र. MH 35 P 4532) मधून देशी दारूची अवैध वाहतूक करताना पोलिसांच्या हाती लागला.

त्याच्याकडून पाच खरड्याचे खोक्यात व दोन पिशवीतील 180 मिलीच्या 288 बाटल्या (किंमत 57,600 रुपये), स्विफ्ट कार (6,00,000 रुपये), मोबाईल फोन (15,000 रुपये), असा एकूण 6,72,600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर तस्करीत राकेश वाघांना (रा. भिडी) व नरेश चांदोरे (चालक, चिंतामणी ट्रेडर्स, कळम) यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, तिघांविरुद्ध देवळी पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन व अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल मंडाळकर, उपनिरीक्षक शिवराज जाधव, हवालदार मनीष कांबळे, राजेश तिवस्कर, दुर्गेश बांनते आणि रंजन पाटील यांनी केली.