
वर्धा :
वर्धा शहरातील विविधा येथील मुद्रांक विक्री केंद्रात विक्रेत्याची मनमानी सुरू असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागते, मात्र ओळखीच्या व्यक्तींना आतून थेट मुद्रांक देण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाचे याकडे स्पष्ट दुर्लक्ष असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
“तोंड पाहून काम केले जाते,” अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून, या मुद्रांक विक्री केंद्रातील अनियमिततेवर प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.





