
प्रतिनिधी : गणेश खंते, खरांगणा मदना
मदाणा येथील मंगल मैत्री बुद्ध विहार येथे १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत, सरपंच, पोलीस पाटील यांनी पुढाकार घेत नियोजनबद्ध पद्धतीने आयोजन केले होते.
या निमित्ताने गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजे, बँड पथक, जयघोष आणि उत्साही वातावरणात संपूर्ण गाव दुमदुमून गेले. मंगल मैत्री बुद्ध विहार ते संपूर्ण गाव असा मिरवणुकीचा मार्ग ठेवण्यात आला होता.
कार्यक्रमात गावातील महिला, पुरुष, युवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ग्रामस्थांनी वर्गणी, धान्य व आर्थिक स्वरूपात सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वप्निल खांडेकर, सचिन मेश्राम, अमोल मोटघरे, प्रेमदास भुसे, सदाशिव गेडाम, सुशील गेडाम, प्रकाश गेडाम आदींनी विशेष परिश्रम घेतले.
गावातील सर्व नागरिक, पोलीस पाटील, सरपंच तसेच वॉर्ड क्रमांक दोनमधील ग्रामस्थांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. महिला मंडळांनी उपस्थितांचे स्वागत करत पुढील वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
मंगल मैत्री बुद्ध विहार समितीच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.





