
वर्धा :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या वर्धा जिल्हाध्यक्षपदी अतुल वांदिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींच्या विश्वासास पात्र ठरून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली असून, जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अतुल वांदिले हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजकारण व पक्ष संघटन कार्यात सक्रिय आहेत. त्यांनी पक्षाच्या विविध पदांवर काम करताना कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवून संघटन मजबूत करण्यास हातभार लावला आहे.
त्यांच्या नियुक्तीबद्दल पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.





