
मुख्य संपादक – पंकज तडस ( 9975765632 )
सेलू :–
तालुक्यातील घोराड येथील वार्ड क्र. ४ मधील बाल गणेश उत्सव मंडळ यांच्या वतीने यावर्षी गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. मंडपात आकर्षक सजावट करून गणेशमूर्तीसमोर “झाडे लावा – झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा” असा प्रभावी संदेश फलकांद्वारे देण्यात आला आहे.
भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांची सांगड घालून पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटविण्यात आले आहे. येथे या फलकाखाली पूर्वीचे हिरवेगार वातावरण दाखविण्यात आले तर भविष्यात या वृक्षतोडीमुळे उद्भवणारे संकट या फलकाचे माध्यमातून दाखवून दिले आहे. त्यातून भाविकांना वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले जात आहे.
गणपती बाप्पाच्या उत्सवातून समाजप्रबोधनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.





