
सेलू :–
परतीच्या प्रवासात पावसाने कहर केल्याने शेतीपिकाचे नुकसान होत आहे मंगळवारी दुपारी परत सेलूत दमदार पावसाने हजेरी लावल्याने नदी नाल्याला पुर आला असून शेतकर्यांची चिंता वाढली आहे
मंगळवारी ता 16 ला दुपारी चार वाजताचे सुमारास अचानक मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली या दुपारी चार वाजताचे सुमारास झालेल्या दमदार पावसामुळे शेतशिवारातून पाणी वाहत असल्याने नदी नाले दुथडी भरुन वाहू लागले या पावसामुळे शालेय विद्यार्थ्यांची दमछाक झाली भर पावसात त्यांना घराचा रस्ता धरावा लागला
लगातर होत असलेल्या या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांना फटका बसला असून सोयाबीन, तूर, कपाशीचे पिकाचे नुकसान होत आहे आधीच सोयाबीन वर आलेल्या रोगराई मुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे त्यातच लगातर सुरु असलेल्या या पावसामुळे शेतीपिकाचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकर्यांच्या चिंतेत भर पडली आहे आधीच अडचणीत सापडलेल्या अन्नदात्याला यावर्षीही नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे शासनाने शेतीपिकाचे होत असलेले नुकसान पाहता ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.





