Home Breaking News अती पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – कपाशी, सोयाबीन, तुर पिके पाण्याखाली

अती पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – कपाशी, सोयाबीन, तुर पिके पाण्याखाली

255

सेलू :–

तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला सततधार पावसामुळे तसेच गुरूवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येऊन शेतात पाणी साचले आहे. परिणामी कपाशी व सोयाबीन तुरी चे पिकासह हंगामी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे

कपाशी,तुर व सोयाबीन पीवळी पडली असून पिकांची गळती यामुळे पिके उध्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही शेतांमध्ये उगवलेली पिके पूर्णपणे नष्ट झाली असून उर्वरित पिकेही रोगराईच्या विळख्यात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांचा शेतीखर्च वाढला असून उत्पादनावर पाणी फिरल्याने आर्थिक संकट गडद झाले आहे.त्यातच वन्यप्राण्याचा वाढता हैदोस पाहता शेतातील पिके उध्वस्त होत आहे

शेतकऱ्यांनी शासन व प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत असून शेतकरी हतबल झाले आहेत.