Home महाराष्ट्र आश्वासन दिले कर्ज माफी चे भारी, शेतकरी फिरतो दारोदारी 

आश्वासन दिले कर्ज माफी चे भारी, शेतकरी फिरतो दारोदारी 

103

बळीराजाची शासनाला चपराक

सर्वत्र बैलपोळा उत्साहात साजरा 

सेलू :–

शेतकर्‍यांचा सण पोळा तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला यात मात्र बळीराजाने बैलाचे पाठीवर लिहीलेले घोषवाक्य “आश्वासन दिले कर्ज माफी चे भारी, शेतकरी फिरतो दारोदारी ” हे अनेकांचे लक्ष वेधून घेणारे ठरले शेतकर्‍यांकडे शासनाने पाठ फिरवल्याने दुर्लक्षित असलेल्या या बळीराजाने यावर्षीचे बैलपोळ्यात यामाध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली

घोराडचे बैलपोळ्याला धार्मिकतेची जोड असल्याने या पोळ्याला विशेस महत्त्व प्राप्त झाले आहे येथील पोळ्यात बैलजोडीवर लिहीलेले वाक्य अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारे ठरले एका बैलावर कर्जमाफी विषयी तर दुसर्‍या बैलावर लाडक्या बहिणीला हसू शेतकर्‍यांच्या डोळ्यात आसू असे घोषवाक्य लिहीलेले होते शासनाचे चुकीचे धोरण आणि बळीराजाची व्यथा या माध्यमातून शेतकर्‍यांनी मांडली बँडबाजा सर हर महादेव चा गजर करीत बैलपोळ्यात शेतकर्‍यांचा उत्साह दिसून येत होता घोराड येथे मंदिरातून निघालेली दिंडी हरिनामाचा गजर करीत पाच प्रदक्षिणा घालत मशाल पेटविल्यानंतर बैल पोळ्याची सांगता करण्यात आली गावागावात सर्वत्र बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला.