
गृहराज्यमंत्री यांचे आंजी येथे नवीन पोलीस स्टेशन स्थापन करण्याच्या सुनील गफाट यांच्या मागणीला दिले सकारात्मक आश्वासन
वर्धा :
आंजी मोठी येथे नवीन पोलीस देण्यात यावे अशी मागणी भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष सुनील गफाट यांनी गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याकडे केली आहे, यावर गृहराज्यमंत्री यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे.
आंजी मोठी व आंजी सर्कल मध्ये जवळपास ४० गावे आहेत, तसेच आंजी हे वर्धा तालुक्यात येत असून आंजी मोठी व आंजी सर्कल मधली ४० गावे हे सर्व खरांगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतात व खरांगणा पोलीस स्टेशन हे आर्वी तालुक्यामध्ये येते, कुठलेही घटना, वादविवाद तसेच संबंधित कामे खरांगणा पोलीस स्टेशनला जाऊन करावे लागते, तसेच आंजी मोठी व परिसरातील ४० गावांमधील घटना,वादविवादसह इतर तक्रारी व संबंधित कामे हे खरांगणा पोलीस स्टेशनला दाखल झाल्यानंतर संबंधित प्रकरणाचा खटला हा आर्वी न्यायालयात चालवला जातो, म्हणजे आंजी येथून खरांगणा पोलीस स्टेशन दूर असून त्यात आर्वीचे अंतर हे जवळपास ४५ ते ५० किलोमीटर पर्यंत आहे,त्यामुळे आंजी व आंजी सर्कल मधील ४० गावातील लोकांना लवकर पोलीस मदत मिळत नाही,त्यामुळे कुठल्याही अनुचित प्रकार किंवा घटनेला सामोरे जावे लागते अशी खंत व तक्रार अनेक दिवसापासून आंजी व परिसरातील ४० गावातील नागरिकांची होती.
आता काही वर्षात आंजी व आंजी परिसरातील गावांचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे व पुढेही होणार आहे.तसेच आंजी मोठी ते वर्धा हे अंतर फक्त 16 किलोमीटर आहे तसेच अंजी येथे पोलीस स्टेशन झाल्यास सदरचे न्यायालय हे वर्धा राहील त्यामुळे नागरिकांना पोलीस मदत लवकर मिळेल तसेच सदर प्रकरण हे वर्धा न्यायालयात चालवल्या जातील,त्यामुळे येथील नागरिकांना पोलीस मदत लवकर मिळेल अनुचित प्रकार व घटना टाळण्यास मदत होईल तसेच न्यायालय वर्धा असल्याने वेळेचा व प्रवास संदर्भानेसुद्धा योग्य राहील त्यामुळे आंजी येथे पोलीस स्टेशन असावे या नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी आंजी येथे नवीन पोलीस स्टेशन द्यावे अशी मागणी गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याकडे केली आहे,या मागणीला गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आंजी येथे नवीन पोलीस स्टेशन उभारण्याबाबत ठोस आश्वासन देत याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
आंजी येथे नवीन पोलीस स्टेशन झाल्यास आंजी मोठी व परिसरातील ४० गावातील लोकांना होणारा त्रास टळेल तसेच पोलीस मदत लवकर मिळाल्याने परिसरात होणाऱ्या घटना व अनुचित प्रकाराला आळा बसेल तसेच न्यायालय वर्धा असल्याने वेळेचा व पैशाचा बोझा कमी होईल,तसेच परिसरातील नागरिकांना लवकर न्याय मिळण्यास फायदाचे ठरेल ,तसेच गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्र्यांनी सुचवल्याप्रमाणे याबाबतचा प्रस्ताव लवकरच सादर करू त्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी यानिमित्ताने व्यक्त केले.





