
नंदी सजावट आणि वेशभूषा नंदी धारक अशा दोन गटात २५० बक्षिसांचे
मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन चिमुकल्यांचा सन्मान
सिदी (रेल्वे) :
तान्हा पोळा कृती समितीच्यावतीने सलग एकविसाव्या वर्षी येथील जुन्या पोलीस ठाणा परिसरात दुपारी तीन ते सात वाजता दरम्यान आयोजित बाल तान्हा पोळा महोत्सवात दोन हजार बालगोपालांच्या उपस्थितीने रंगत आली.
शेतकरी आत्महत्या,शेतमालाचे घटलेले बाजारभाव,शेतकरी कर्ज माफी, अंधश्रद्धा, वृक्षसंवर्धन, आतंकवाद,आपरेशन सिंदुर,फिल्मी जगत आदींवर भाष्य आणि संदेश देणारे जीवंत देखावे तसेच स्वातंत्र्यवीर,सैनिक, भारतरत्न, विवीध धर्माचे देवी देवता, श्रावणबाळ आदीची सुंदर वेशभूषा केलेल्या सहभागी बाल धारकांनी पोळ्याचे आकर्षक वाढविले.
तर सजवलेला नंदीगट आणि फॅन्सी ड्रेस परिधान करनारा नंदीधारक गट अशा दोन गटात विभागणी करुन नंदीधारकातुन पोळा कृती समीतीनी नियुक्त केलेल्या परिक्षण मंडळातील सदस्या सुरेखा साठे,भारती मुळे,गोपाल गवई ,अमोल गवळी यांनी निवडलेल्या २५० चिमुकल्या नंदी धारकांना विशेष भेट वस्तू पुरस्कार स्वरुपात(बोजारा) देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
तर दरवर्षी प्रमाणे यंदाही या पोळ्यात सहभागी होणाऱ्या दोन हजार चिमुकल्यांना रजिस्टर ,कंपास किट,रोल चाॅकलेट, बिस्किट पुडा आदी साहित्य असलेली दोन हजार पिशवीचे सुध्दा वाटप करण्यात आले.
दोन हजार दोनसे पुरस्काराचे आयोजन करण्यासाठी तान्हा पोळा कृती समितीला खासदार अमर काळे,आमदार अभीजीत वंजारी, हिंगणघाट बाजार समितीचे सभापती सुधीरबाबु कोठारी,नोबल बाॅयसन्स स्टील कंपनी ,राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वादिले,लोहीया बीज भंडार नागपूरचे विजयजी लोहीया, सामाजिक कार्यकर्ते अमित आणि आयुष पालिवाल,अंकुर सिडस कंपनीचे काशीकरजी,सिंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय आश्रमा,ठाणेदार नरेंद्र निस्वादे, सामाजिक कार्यकर्ते संजयजी तडस,अजय वांदीले, कंत्राटदार मोहन मुडे (हिंगणघाट),सतिश ढोक, सुनील पाठेकर (वर्धा),धनंजय बरडे (नागपुर), पर्यावरण गतवीधी समितीचे विवेक मांडवकर, अंकित ढोबळे,अनिल साठोने आदी दानदात्यांनी सरळ हस्ते भरघोस मदत केली.
संपूर्ण शहरातुन बालगोपालानी आपला नंदी व स्वतः विवीध वेशभूषा करून सामाजिक संदेश देत भाग घेतलेल्या
सहभागी दोन हजार बालगोपाल नंदी धारकांना थैलीचे कृती समीतीच्या बोजारा वाटप सदस्यानी वाटप केले.
तर परिक्षण मंडळाने निवडलेल्या दोनसे पन्नास बाल नंदी धारकांना दानदात्यांकडुन पुरस्कार स्वरुपात शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन मोहन सुरकार, असलम पठान यांनी केले. उपस्थिताचे आभार आशिष देवतळे यांनी मानले.
तान्हा पोळा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी तान्हा पोळा कृती समितीचे अशोकबाबु कलोडे, बाबाराव सोनटक्के, राजेंद्र गहेरवाल, सुनिल बोंबले, विलास तळवेकर, खुशाल बोरकर, कमालाकर वाघमारे, गुल्लु भंसाली,रवी राणा, अनिल बाकडे, अवी मुठाळ, मदन हांडे, रमेश वडांद्रे, बालु पोकळे, कुणाल उपगडे आदी सर्व पदाधिकार्यानी अथक परिश्रम घेतले.





