
वर्धा :-
जिल्ह्यात आदर्श ग्राम म्हणून ओळख असलेले पळसगाव बाई येथील सरपंच धीरज लेंडे यांनी गावात केलेल्या विविध विकासात्मक व नाविन्यपूर्ण कृतीची दखल घेत अखिल भारतीय सरपंच परिषद, महाराष्ट्र राज्य यांनी दखल घेत लोणावळा येथे दिनांक 30 जुलै ला झालेल्या समारंभात सन्मानपत्र देत गौरव करण्यात आला, पळसगाव बाई जिथे पिण्याच्या पाण्याकरिता इतर विहीर अधिग्रहण करीत पाणीपुरवठा करण्यात येत होता, त्या ठिकाणी अतिशय योग्य नियोजन करीत जलसंधारण आणि नदी खोलीकरणाचे काम हाती घेत मुबलक पाणीसाठा तयार करीत गावाला 24 तास पाणीपुरवठा करणारे गावाची ओळख निर्माण केली, तंटामुक्त अध्यक्ष असताना गावातील तंटे समोपचाराने सोडवून काम केले, गावाचा येत्या पंधरा वर्षात जो विकास करायचा आहे त्याचा आराखडा बनवत पाच वर्षात गावातील संपूर्ण रस्ते नाल्या करीत भौतिक विकासाच्या दृष्टिकोनातून आमुलाग्र बदल गावात केले, त्याचाच परिपोष म्हणून गावाला नऊ पारितोषिक प्राप्त झाले असून जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात गावाची ओळख निर्माण झाली. गावात लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांचा विचार करीत व्यायामशाळा, वाचनालय, संगणक लॅब, ओपन जिम, आदिवासी व इतर समाजासाठी समाज भवन, तीर्थक्षेत्र विकासाकरिता निधी, पर्यटन विकासाकरता निधी, व सर्वात महत्त्वाचे म्हणजे कचरा मुक्त व हगणदारीमुक्त गाव करीत एक छोटासा खेडही शहरासारख्या सुविधा देण्यास सक्षम असू शकते हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले. हे करीत असताना कार्यसम्राट आमदार समीर कुणावार, माजी खासदार रामदासजी तडस, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, पालकमंत्री पंकज भोयर, त्याचप्रमाणे प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांनी भरीव सहकार्य करीत त निधी देण्याबाबत मोलाची भूमिका गाव विकासाकरिता महत्त्वाची ठरली आहे, गावात वेगवेगळ्या समित्या करीत त्यांची जबाबदारी त्यांच्यावर टाकत गावकऱ्यांचा सहभाग प्रत्येक कार्यात घेतला, मनरेगा व अभिसरणातून गावात बचत गट भवन ,सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक यासारखे कामे करीत जिल्ह्यात एक नवीन पायंडा सुरू केला, त्यांच्या नेतृत्वात वेगवेगळ्या प्रकारचे नाविन्यपूर्ण कामे गावात होत गावाचा चौफेर विकास करण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न होताना दिसतात, लहान लहान बाबींवर लक्ष देत तसेच शेतकऱ्यांसाठी पांदण रस्ता महत्त्वाचा असल्याकारणाने गावातील तीन पांदन रस्ते योजनेच्या माध्यमातून पूर्णत्वास नेले, सरपंच होताच केंद्रीय 15 वित्त आयोगाच्या अंतर्गत गावातील आरोग्याचा विचार करत, उपकेंद्र सक्षम तयार केले तसेच नवीन उपकेंद्राकरिता निधी उपलब्ध करून घेतला, विकास करीत असताना आपलं गाव ही भावना गावकऱ्यांमध्ये निर्माण करण्यात ते यशस्वी झाल्यामुळे गावकऱ्यांनी प्रत्येक कार्यात हिरीरीने भाग घेतला, धीरज लेंडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यामुळे गावात व परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
पळसगावचे सरपंच धीरज लेंडे हे अतिशय गावाबद्दल समर्पित असून गावाकरिता निधी मागण्याकरिता वारंवार तकादा लावत मोठा निधी मंजूर करून घेतला. त्याची गावाबद्दलची तळमळ पाहता कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता गावाला होऊ दिली नाही व पाठीशी खंबीर उभे राहिलो गावाला ग्रामरत्न सरपंच म्हणून मिळालेल्या पुरस्काराबद्दल फार समाधान वाटते. आमदार समीर कुणावार
राज्यस्तरीय ग्रामरत्न पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल धीरजचे मी अभिनंदन करतो, चिकाटी, जिद्द,सातत्य ठेवत कामे केल्यास गावाचे नावलौकिक राज्यात होत असल्याचे समाधान व्यक्त करतो, गावाला योग्य दिशा देत भरीव विकास कामे करत आमुलाग्र बदल घडवत गावाला आदर्श ग्राम म्हणून नावलौकिक प्राप्त करून दिले याचा अभिमान वाटतो. माजी खासदार रामदासजी तडस
धीरज ने गावाचा विकास करण्याकरिता विशिष्ट नियोजन करीत सर्वप्रथम भौतिक विकास सावर जोड देत सोयी सुविधा उपलब्ध करून घेतल्या त्याचप्रमाणे श्रीक्षेत्र पर्यटनवर तीर्थक्षेत्र विकास करण्याकरिता देवस्थानला मोलाची मदत करीत भरीव निधी खेचत आणला. आमदार समीर भाऊ पाठीशी असल्यामुळे हे सर्व शक्य झाले आहे, त्यांना मिळालेल्या ग्रामरत्न पुरस्कारामुळे आम्हाला त्याचा अभिमान आहे.. सुरेश केशवराव लेंडे, अध्यक्ष श्री संत सखुबाई देवस्थान
मला मिळालेला पुरस्कार हा फक्त माझा नसून हा संपूर्ण गावाचा आहे गाव विकासाकरिता ज्यांनी ज्यांनी मोलाचे सहकार्य केले , माझे गावाबद्दल पाहिलेले स्वप्न गावकऱ्यांनी आपले समजून हिरीरीने प्रत्येक कार्यात सहभाग नोंदवत, गावाचे नाव लौकिक मोठे केले त्यामुळे हा पुरस्कार माझे मित्रमंडळी, गावकरी, अधिकारी वर्ग, तसेच समीर भाऊ कुणावार यांना मी समर्पित करीत आहे. धिरज लेंडे ( पळसगाव बाई )





