Home वर्धा अज्ञात वाहनाचे धडकेत पादचारी जागीच ठार 

अज्ञात वाहनाचे धडकेत पादचारी जागीच ठार 

85

महाबळा नजीक अपघात

सेलू :–

सेलू नागपूर महामार्गावरील महाबळा नजीक नायरा पेट्रोल पंपाजवळ बैल चराई साठी गेलेल्या पादचारी व्यक्तीला भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पादचारी जागीच ठार झाला ही घटना रविवारी दुपारी चार वाजताचे सुमारास घडली दिलीप मोतीराम जेंगठे वय 46 रा महाबळा असे मृत व्यक्तीचे नाव आहे

महाबळा येथील दिलीप जेंगठे हा बैल चराई साठी घेवून गेला होता तो परत येताना नायरा पेट्रोल पंपाजवळ भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने धडक दिली यात तो जागीच ठार झाला घटनेनंतर ट्रकचालक वाहनासह पसार झाला यात घटनेची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली सेलू पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले पुढील तपास पी एस आय किरण महाजन करीत आहे