
सेलू :–
जागतिक पोलीस अँड फायर गेम 2025 बरमिंगहम, आलाबामा – अमेरिका (USA) या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत सेलुतील कु. सुनैना विष्णुजी डोंगरे यांना एक सुवर्ण तर एक व सिल्व्हर मेडल मिळविले.
सुनैना डोंगरे यांनी फिजिक्स या प्रकारात 156 cm उंची गटामध्ये सुवर्ण व बिकिनी या प्रकारामध्ये सिल्व्हर मेडल मिळविले, सुनैना हिने वर्धा पोलीस व महाराष्ट्र पोलीस दलाचे व देशाचे नाव उंचावून भारताचा तिरंगा अभिमानाने फडकविला.
सुनैना विष्णूजी डोंगरे ही या स्पर्धेसाठी दररोज सकाळी दोन व सायंकाळी दोन तास असे चार तास सुभाष पुजारी पोलीस निरीक्षक आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव खेळाडू यांचे मार्गदर्शनाखाली सराव करीत होती.
या स्पर्धेसाठी 76 देशातील संघानी सहभाग नोंदविला.
सुनैना डोंगरे यांनी आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त केले आहे. त्यांनी हे पहिलेच आंतरराष्ट्रीय पदक मिळवलेले आहे.
या स्पर्धेसाठी त्यांना अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा, डॅा. सागर कावडे अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा, राजेश उंबरे पोलीस हवालदार, राइनोमाइट क्लिनिक अंधेरीचे मुंबईचे डॉ. कनिष्क जैन व डॉ. असीम माथन, सुदर्शन खेडकर ऋषी पेणकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
या त्यांना मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे त्यांना गृहराजमंत्री पंकज भोयर, परिक्षेतराचे विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील, तसेच प्रमोद हिवाळे पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी व सहकारी मित्र सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. सूनैना ही सेलू येथील सुर्यधरंम स्पोर्टीग क्लबची खेळाडू आहे.





