Home Breaking News महाबळा नजीक कार पलटी झाल्याने एक गंभीर जखमी 

महाबळा नजीक कार पलटी झाल्याने एक गंभीर जखमी 

216

सेलू :–

सेलू नागपूर महामार्गावरील महाबळा नजीक कार पलटी झाल्याने एक गंभीर जखमी झाल्याची घटना ता. ४ ला रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान घडली विनोद ईश्वर चचेरकर वय ३८ रा. वर्धा असे गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार विनोद चाचेकर हे सिंदी रेल्वे येथून आपल्या MH ३४ AM ६७७२ या क्रमांकाच्या कारने ड्युटी चे काम आटपून वर्धा येथे घरी परत जात होते. दरम्यान वर्धा नागपूर महामार्गावर महाबळा जवळ त्यांची कार अनियंत्रित होऊन पलटी झाली यात विनोद चाचेकर यांच्या डोक्याला मार लागला व ते गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी तात्काळ जखमीला तातडीने ग्रामीण रुग्णालय सेलू येथे दाखल केले डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून डोक्याला जबर मार असल्या मुळे त्यास पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.