Home Breaking News उष्म्याच्या लाटेमुळे वर्धा जिल्ह्यात उद्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर

उष्म्याच्या लाटेमुळे वर्धा जिल्ह्यात उद्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर

272

वर्धा :–

भारतीय हवामान विभागाने वर्धा जिल्ह्यासाठी उष्णतेचा इशारा (यलो अलर्ट) दिल्याने जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांना दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष वामनराव सी. यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत हे आदेश जारी केले.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार वर्धा जिल्ह्यात तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व सरकारी व खासगी अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना गुरुवार, १६ एप्रिल रोजी सुट्टी राहणार आहे.