Home Breaking News घोराड येथे विनामूल्य बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन

घोराड येथे विनामूल्य बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन

321

सेलू  :–

तालुक्यातील घोराड येथील विठ्ठल-रुख्माई देवस्थानात ४ मे ते १५ मे या कालावधीत विनामूल्य बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

संत केजाजी महाराज हरिपाठ मंडळ व केजाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात येत आहे. या शिबिरासाठी ह.भ.प. नरेश महाराज पाटील (आळंदी) व ह.भ.प. प्रमोद महाराज ठाकरे (आळंदी) मार्गदर्शन करणार आहेत.

शिबिरामध्ये बालकांना लाठी-काठी प्रशिक्षण, हरिपाठ, भगवद्गीता, हनुमान चालीसा, विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी ओव्या, मृदुंग आदी विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करणार असून तालुक्यातील विविध अधिकारीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत.

हे शिबिर विठ्ठल-रुख्माई देवस्थानाच्या सभागृहात होणार असून भक्तिरसाच्या वातावरणात बालकांना संस्कार व शिक्षणाचा अनोखा अनुभव मिळणार आहे.

इयत्ता ४ थी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या शिबिरात सहभागी होता येणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी गाव व परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी डॉ. सुरेंद्र भुते, विजय माहुरे, पुरुषोत्तम गुजरकर, परसराम गोमासे, सौरभ पोहाणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.