Home Breaking News शेतातील सागवानाला आग आगीमध्ये शेतकऱ्याचे नुकसान 

शेतातील सागवानाला आग आगीमध्ये शेतकऱ्याचे नुकसान 

138

सेलू :–

तालुक्यातील खडकी येथील शेतकरी मोहम्मद रियाज रशीद मुसानि यांचे शेतातील सागवानाला आज शनिवारी दुपारी 1,30 वाजताचे सुमारास अचानक आग लागली . आगीमध्ये शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे

अचानक लागलेल्या आगेवर खडकी येचिल समाजसेवक माणिक देडे आणि त्यांचे वडील खंडोजी देडे यांनी शेताकडे धाव घेऊन पाण्याच्या साह्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आगिने रुद्र अवतार घेतल्याने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले अग्निशमन घटनास्थळी पोहोचताच सेलू अग्निशामक दलाचे हर्षल गोरखे फायरमॅन ,संदीप शिर्के , प्रमोद रहांगडाले सहाय्यक फायरमैन यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.