Home Breaking News शेतातील तुरीचे गंजीला लावलेल्या आगीत 2400 पेट्या जळून खाक 

शेतातील तुरीचे गंजीला लावलेल्या आगीत 2400 पेट्या जळून खाक 

284

सेलू पोलिसांत तक्रार दाखल 

सेलू :–

मौजा कोलगाव शिवारातील मयुर अनिल काळबांडे यांचे साडेतीन एकरातील तुरीचे गंजीला लावलेल्या आगीत २४०० पेट्या जळून खाक झाल्याने शेतकरयांचे २ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे ही घटना गुरुवारी ता १२ ला सकाळी उघडकीस आली याबाबत सेलू पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे

सेलू येथील प्रभाग क्रमांक १७ मधील रहिवासी मयुर काळबांडे यांचे मालकीची मौजा कोलगाव शिवारात शेती असून त्यांनी यात यावर्षीला सलग तुरीची लागवड केली होती या तुरीची कापणी झाल्यानंतर बुधवारी ता 11 ला तुरीची गंजी लावली होती याच रात्रीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने तुरीचे गंजीला लावलेल्या आगीत साडेतीन एकरातील २४०० पेट्या पुर्ण पणे जळून खाक झाल्या असून जवळच असलेल्या बंडीला याआगीची झळ पोहोचली दुसरे दिवशीला सकाळी त्यांना याची माहिती मिळताच शेताकडे धाव घेतली असता आगीत सर्व जळून खाक झाल्याने या शेतकऱ्याने सेलू पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला याप्रकरणी ज्या लगतच्या शेतकऱ्याबाबत शेताचे रस्त्यावरून वाद आहे त्या तिघांचे हे कृत्य असल्याचा संशय या शेतकऱ्याने व्यक्त केला आहे या तिघांचा परिसरात अनेक शेतकऱ्यांना त्रास असल्याचे शेतकरी सांगत आहे याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून अधिक तपास सुरू आहे.