Home वर्धा हिंगणघाटमध्ये गांजा विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक ; ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त

हिंगणघाटमध्ये गांजा विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक ; ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त

311

हिंगणघाट : –

अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक केली. आरोपीकडून ५२४ ग्रॅम गांजा, मोटारसायकल व मोबाईल असा एकूण ८८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि. ७ फेब्रुवारी रोजी हिंगणघाट शहरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली. स्वीपर कॉलनी, महात्मा फुले वॉर्ड येथील प्रमोद छन्नु सांडेकर हा शहालंगडी मंदिर ते दालमिल मार्गे हायवे रोडलगत अतिक्रमणावरील झोपडीतून गांजाची विक्री करीत असल्याची माहिती मिळताच पथकाने एनडीपीएस कायद्यान्वये छापा टाकला. झडतीदरम्यान आरोपीकडून ५२४ ग्रॅम गांजा मिळून आला.
याप्रकरणी हिंगणघाट पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पो.उपनि. सलाम कुरेशी व त्यांच्या पथकाने केली.