
शेतकर्यांच्या मागण्यांसाठी नागपुरात महाएल्गार
सेलू :–
शेतकर्यांचा सातबारा कोरा करावा, शेतीमालाला योग्य भाव मिळावा, दिव्यांगाचे मानधनात वाढ करावी आदी मागण्यांसंदर्भात प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चु कडू यांच्या आर्वी येथून नागपूर कडे निघालेल्या ट्रँक्टर रँलीचे २८ ला सेलूत आगमण होताच सेलू बायपासवर जंगी स्वागत करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्यांनी जय जवान जय किसान चे नारे देत, शेतकर्यांचासातबारा कोरा झालाच पाहिजे अशा घोषणा दिल्याने परिसर दणाणून गेला होता यावेळी कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह आणि आक्रमक रूप पाहता शेतकरी आता एकवटल्याचे चित्र येथे पाहायला मिळाले.
सुकळी येथील मुक्कामानंतर मंगळवारी २८ ला ही ट्रँक्टर रँली येळाकेळी, पिपरी, वर्धा, पवनार मार्गे सकाळी १२.३० वाजता स्वागत सेलू बायपासवर दाखल होताच बँडबाजा सह याचे फटाक्यांची आतिषबाजी करीत रँलीचे स्वागत करण्यात आले येथे यावेळी काग्रेस माजी जिप अध्यक्ष विजय जयस्वाल, काशीनाथ लोणकर सह काँग्रेसचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे कार्यकर्ते, प्रहार अपंग क्रांती संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते, प्रहार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते ,किसान अधिकार अभियान चे कार्यकर्त्यांसह विविध गावांतील शेतकर्यांची उपस्थिती होती दुपारी एक वाजता ही रँली केळझर, खडकी, सेलडोह मार्गे बुटीबोरी नागपूरकडे रवाना झाली या रँलीचे केळझर, खडकी, सेलडोह येथे स्वागत करण्यात आले नागपूर येथे कापूस संशोधन केंद्रालगतचे मैदानावर रँलीचा मुक्काम असून शेतकर्यांचे वीवीध मागण्यांसाठी आंदोलन उभे केले जात आहे शेतकर्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय तेथून हटणार नाही असा पवित्रा बच्चू कडू यांनी घेतल्याने अनेकांचे लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी यात सहभागी व्हावे असे आव्हान प्रहार संघटना व महाविकास आघाडी तथा किसान अधिकार अभियानाच्या वतीने करण्यात आले आहे.





