Home Breaking News पावसात शेतमाल भिजल्याने शेतकरी संतप्त — सभापती व सचिवांना घेतले धारेवर

पावसात शेतमाल भिजल्याने शेतकरी संतप्त — सभापती व सचिवांना घेतले धारेवर

177

सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू उपबाजारपेठेतील प्रकार

सेलू :

अचानक आलेल्या पावसामुळे सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू उपबाजारपेठेत शेतकऱ्यांचा मोठा तोटा झाला. उघड्यावर ठेवलेला सोयाबीन माल पावसात भिजून वाहून गेला. या नुकसानीमुळे शेतकरी आक्रोशित झाले असून त्यांनी बाजार समितीचे सभापती आणि सचिव यांना धारेवर धरले.

शेतकऱ्यांचा आरोप आहे की बाजार समितीच्या गाळ्यांवर व्यापाऱ्यांचा कब्जा असून, शेतकऱ्यांना आपला माल उघड्यावर ठेवण्याची वेळ येते. व्यापाऱ्यांचा माल मात्र शेडखाली सुरक्षित ठेवला जातो. परिणामी पावसात शेतकऱ्यांचा माल खराब झाला आणि हजारो रुपयांचे नुकसान झाले.

या घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी सभापती व सचिव यांच्यासमोर तीव्र शब्दांत आक्रोश व्यक्त करत प्रशासनाकडून तातडीने भरपाईची मागणी केली.

दरम्यान, या प्रकारामुळे बाजार समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.