Home Breaking News अवैध दारू निर्मितीवर सेलू पोलिसांची धडक कारवाई

अवैध दारू निर्मितीवर सेलू पोलिसांची धडक कारवाई

444

मोहगाव शिवारात अवैध दारू निर्मितीवर सेलू पोलिसांची धडक कारवाई

सेलू :-

सेलू पोलिसांनी दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करत मोहगाव शिवारात अवैध दारू निर्मितीचा प्रकार उघडकीस आणला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.४५ ते ४.१५ वाजेच्या सुमारास पोलिस निरीक्षक मनोज गभणे यांच्या पथकाने मोहगाव शिवारात छापा टाकला. शंकर पुरुषोत्तम पिंपळे रा. शिवनगाव यांच्या शेतात प्री रेड केली असता अवैधरीत्या दारू भट्टी तयार करीत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी घटनास्थळीून २०० लिटर चे १८ लोखंडी ड्रम मध्ये ३,६०० लिटर कच्चा मोहा साडवा रसायन किंमत ३,६०,००० रुपये व भट्टीचे साहित्य ८ लोखंडी ड्रम, ६ जर्मनी घमेले, विहिरीवरील १ एच. पी. मोटार, ४०० फूट रबरी पाईप व इतर दारू भट्टी साहित्य ४४,००० रुपये असा एकूण ४,०४,००० रुपये चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलिस निरीक्षक मनोज गभणे, निरंजन वरभे, पो. हवा. तुषार भुते, मंगेश राऊत, तुषार भोंबे यांनी केली.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.