Home Breaking News दारूबंदी कायद्याअंतर्गत आरोपीला अटक, 63 हजाराचा मुद्देमाल जप्त

दारूबंदी कायद्याअंतर्गत आरोपीला अटक, 63 हजाराचा मुद्देमाल जप्त

219

दारू वाहतूक रोखली; सेलू पोलिसांची धडक कारवाई

सेलू :–

दारुबंदी कायद्याचे उल्लंघन करून देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका इसमाला सेलू पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत पोलिसांनी देशी दारूच्या ८५ शिश्या आणि मोटारसायकल असा मिळून सुमारे ६३,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सेलू पोलिसांना मुखबिराकडून माहिती मिळाली की, एक इसम हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक MH32 AE 1382) वरून नागपूरहून वर्ध्याकडे विनापरवाना देशी-विदेशी दारूची वाहतूक करीत आहे.

त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नागपूर-वर्धा मार्गावरील दंडारे टी पॉइंट येथे नाकेबंदी केली. काही वेळात मिळालेल्या माहितीनुसार संशयित मोटारसायकल येताना दिसल्याने पोलिसांनी ती थांबवली. तपासणी दरम्यान पेट्रोल टाकीवर प्लास्टिकच्या चुंगडीत लपवून ठेवलेली देशी दारू (संत्रा नं.१) च्या ८५ शिश्या आढळल्या.

अवैध दारू वाहतुकीबाबत विचारपूस केली असता इसमाने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीचे नाव सोमेश आनंद पवार (वय ४०, रा. दहेगाव गोसावी, ता. सेलू) असे असून त्याच्याविरुद्ध दारुबंदी कायदा कलम ६५(अ)(ई), ७७(अ) मदका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई मा. पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक मनोज गभने यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार गणेश राऊत, शरद इंगोले, ज्ञानदेव वनवे आणि राज तांबारे (पो.स्टे. सेलू) यांनी केली.