Home Breaking News बस चालकाची मुजोरी अजूनही कायम, प्रवाशांनी हात देऊनही बस थांबविण्यास नकार

बस चालकाची मुजोरी अजूनही कायम, प्रवाशांनी हात देऊनही बस थांबविण्यास नकार

153

साकोली आगाराचे बसचालकाचा प्रताप 

सेलू :–

सेलू हे तालुक्याचे ठिकाण असताना आणि येथे वर्धा नागपूर महामार्गावरील सर्व बसेसला थांबा असतांना बसचालक मनमानी पद्धतीने बस न थांबवता पुढे जात आहे असाच काहीसा प्रकार गुरूवारी ता 18 ला सकाळी नऊ वाजता चे सुमारास पाहायला मिळाला बसचालकाची येथे अजूनही मुजोरी कायम असून यामुळे येथील प्रवाशांना खाजगी वाहनाकडे धाव घ्यावी लागली साकोली आगाराचे बसचालकाचा हा प्रताप पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले

या महामार्गावर बसचालक वाहकास सेलूची एकप्रकारे एलर्जी असल्याचे त्यांचे वागण्या बोलण्यातून दिसून येते त्यांचे या अशा विचित्र वागण्यामुळे सेलूतील प्रवाशांना आगाऊ मनस्ताप सहन करावा लागत आहे सेलूचे बाबतीत ही नेहमीची बाब झाली आहे बसचालक वाहकाचे या अशा बेजबाबदार वागण्यामुळे खासगी प्रवाशी वाहतुकीला चालना मिळत आहे हात दाखवा गाडी थांबवा, थांबा असतांना प्रवाशी न घेणे, प्रवाशांचे सेवेसाठी एसटी महामंडळ हे सर्व येथे थोतांड ठरत आहे याबाबत वारंवार अवगत करूनही वरिष्ठाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने वादाला तोंड फुटत आहे बसचे चालक वाहक नेहमीच नागपूर, वर्धेवरून सेलुला यायचे झाल्यास खाजगी बसचा थांबा नसल्याने सांगत प्रवाशांना परतून लावतात तसेच येथील बोरधरण चौकात अधिकृत थांबा असतांना प्रवाशांना येथे या चौकात न उतरवता कधी बायपासवर तर सरळ बसस्थानकावर उतरवितात तसेच येथून प्रवाशी घेतांना तिकीट देता येत नाही म्हणून टाळाटाळी करताना दिसते ही बाब प्रवाशांचे दृष्टीने तापदायक ठरत आहे यामुळे येथून दररोज येजा करणार्‍या शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची विशेषतः विद्यार्थीनींची गैरसोय होत आहे नाईलाजास्तव या मुलींना खासगी वाहनाने महाविद्यालय गाठावे लागते तेव्हा महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेत या अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर वेळीच कारवाई करून जनतेची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी केली जात आहे.