Home Breaking News सेलू पोलिसांनी गहाळ दोन मोबाईलचा लावला शोध; 42 हजारांचा मुद्देमाल मालकांना परत

सेलू पोलिसांनी गहाळ दोन मोबाईलचा लावला शोध; 42 हजारांचा मुद्देमाल मालकांना परत

93

सेलू :

पोलीस स्टेशन सेलू हद्दीत गहाळ झालेल्या दोन मोबाईल फोनचा यशस्वी शोध लावून सेलू पोलिसांनी संबंधित तक्रारदारांना मोबाईल परत दिले आहेत. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

प्राप्त तक्रारींचा पाठपुरावा करत सेलू पोलिसांनी योगेश मुडे (रा. सेलू) यांचा अंदाजे 15 हजार रुपये किमतीचा वनप्लस कंपनीचा मोबाईल तसेच भूषण करनाके (रा. सेलू) यांचा अंदाजे 27 हजार रुपये किमतीचा नथिंग कंपनीचा मोबाईल शोधून काढला. एकूण 42 हजार रुपये किमतीचे हे दोन्ही मोबाईल संबंधित मालकांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे तथा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ठाणेदार पंकज वाघोडे यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार गणेश राऊत व ज्ञानदेव वनवे यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली.

गहाळ मोबाईल शोधून मिळाल्याने तक्रारदारांनी सेलू पोलिसांचे आभार मानले आहेत.