Home वर्धा विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालक-शिक्षक संवाद महत्त्वाचा – प्रा. डॉ. संदीप काळे 

विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालक-शिक्षक संवाद महत्त्वाचा – प्रा. डॉ. संदीप काळे 

75

सेलू :–

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालक आणि शिक्षक यांच्यातील संवाद हा पूल असून तो अधिक सक्षम असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संदीप काळे यांनी केले.

महाविद्यालयात नुकतीच पालक-शिक्षक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेचे अध्यक्षस्थान विज्ञानशाखा प्रमुख प्रा. डॉ. अनंत रिंधे यांनी भूषविले. प्रा. सीमा तेलरांधे, पालक प्रतिनिधी मीना गावळकर, हरी मंसी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या सभेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत पालकांनी मते मांडली. विद्यार्थ्यांचे अभ्यासावरील लक्ष, शिस्त, तसेच भविष्यातील करिअर घडविण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी एकत्रित प्रयत्न करावेत, यावर भर देण्यात आला. पालकांनी आपापल्या मुलांच्या शैक्षणिक प्रवासातील अनुभव सांगून महाविद्यालयातील विविध उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. सीमा तेलरांधे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पालक व शिक्षक यांचा अधिक प्रभावी संवाद होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सोनाली पाडवे, प्रा. नीता रिठे, प्रा. किरण कोहळे, प्रा. देवयानी ढोले, प्रा. सीमा देशमुख, प्रा. भूषण खोडगे, प्रा. संगिता खोडे आदींनी सहकार्य केले.