Home वर्धा सेलू पंचायत समितीत मुख्यमंत्री ग्रामीण पंचायतराज अभियानांतर्गत कार्यशाळा संपन्न

सेलू पंचायत समितीत मुख्यमंत्री ग्रामीण पंचायतराज अभियानांतर्गत कार्यशाळा संपन्न

220

सेलू  :–

ग्रामपातळीवर विकासाचे नवे शिल्प उभे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पंचायतराज अभियानांतर्गत विशेष कार्यशाळेचे आयोजन पंचायत समिती सेलूच्या वतीने करण्यात आले. हा उपक्रम स्वाभिमान विरासत – स्वावलंबी ग्रामविकास या ध्येयवाक्यासह राबविण्यात येत असून १० सप्टेंबर २०२५ रोजी घोराड येथील यमुना सभागृहात कार्यशाळा पार पडली.

 

कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी देवानंद पाणबुडे होते ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थाचे मोठे योगदान असून त्रिस्तरीय पंचायत राज संस्थेमार्फत ग्रामीण भागाचा सर्वागीण विकास करणे हे मुख्य ध्येय या अभियानाचे आहे सेलू तालुक्यातील ग्रामपंचायती या शासनाच्या प्रत्येक योजनेत सहभागी होऊन समाजाच्या शेवटचे लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहचवण्याचे काम करीत आहे प्रशासन आणि लोकसहभागातून या अभियानाची सुरुवात प्रत्येक ग्रामपंचायत स्तरीय 17 सप्टेंबर पासून करण्याचे आव्हान उपस्थित सन्माननीय सरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी ,कर्मचारी यांना करण्यात आले संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ,माझी वसुंधरा यासारख्या अभियानात तालुक्यातील ग्रामपंचायतीनी सहभागी होऊन तालुका व विभागीय स्तरावर पुरस्कार प्राप्त केले आहे त्यामुळे या अभियानात देखील आपण सर्वोत्कृष्ट कामगिरी करून पुरस्काराचे मानकरी ठरू अशी आशा आहे

या कार्यशाळेस सहाय्यक गटविकास अधिकारी रामचंद्र चापडे,गटशिक्षणाधिकरी संगीता महाकाळकर, तालुका आरोग्य अधिकारी राम वरठी,उप अभियंता धिरज परांडे, बालविकास प्रकल्प अधिकारी वंदना नागोसे,कृषी अधिकारी सुनील मुरारकर, नायब तहसीलदार किरसान, विस्तार अधिकारी के पी बर्धिया, रमेश तेलरांधे, सरपंच पंचायत समिती कर्मचारी, रोजगार सेवक ,केंद्रचालक उपस्थित होते

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामचंद्र चापडे यांनी, सूत्रसंचालन अरविंद भोसकर, तर संतोष शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले