Home वर्धा मदना ग्रामपंचायतीचा भोगळ कारभार; दूषित पाण्यामुळे ग्रामस्थ त्रस्त

मदना ग्रामपंचायतीचा भोगळ कारभार; दूषित पाण्यामुळे ग्रामस्थ त्रस्त

485

मदना (ता. आर्वी) : – गणेश खंते

मदना येथील ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे गावातील नागरिकांना मागील वर्षभरापासून दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. गावातील पाण्याच्या टाकीची सिडी (पायऱ्या) वर्षभरापूर्वी कोसळली असून त्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

सुमारे १२०० लोकसंख्या असलेल्या या गावासाठी एकच पाण्याची टाकी असून, त्यातूनच संपूर्ण गावाला पाणीपुरवठा केला जातो. मात्र टाकीची योग्य देखभाल न झाल्यामुळे पाणी दूषित होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

या संदर्भात ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु ग्रामसेवक अर्चना नाखले यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, आपली समस्या नेमकी कोणाकडे मांडावी असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. दूषित पाण्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.