
वर्धा :–
बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय बंजारा परिषद या संघटनेच्या वर्धा जिल्हाध्यक्ष पदी शुभम भाऊ राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे संघटनेला जिल्ह्यात तरुण आणि सक्षम नेतृत्व लाभले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही नियुक्ती संघटनेचे मार्गदर्शक किसन भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मोहन भाऊ चव्हाण, राष्ट्रीय सल्लागार विलासभाऊ राठोड, राष्ट्रीय कार्याध्यक्ष अॅड. पंडित भाऊ राठोड तसेच विदर्भ अध्यक्ष सुदाम भाऊ राठोड यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गोरनायक उमेश भाऊ राठोड यांनी अधिकृत नियुक्तीपत्र देऊन शुभम भाऊ यांच्यावर ही जबाबदारी सोपवली.
नियुक्तीनंतर बोलताना शुभम भाऊ राठोड यांनी संघटनेचे आभार मानत सांगितले की, “बंजारा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रश्नांसाठी मी सातत्याने कार्य करणार असून, संघटनेचे कार्य वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक तांड्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहील.”
दरम्यान, शुभम भाऊ यांच्या निवडीची बातमी समजताच जिल्ह्यातील विविध भागांत आनंद व्यक्त करण्यात आला. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून व पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. विशेषतः युवकांमध्ये या नियुक्तीमुळे नवचैतन्य निर्माण झाले आहे.
लवकरच वर्धा जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असून, संघटनेच्या माध्यमातून व्यापक जनसंपर्क मोहिम राबवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.





