Home वर्धा शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या प्राची पाचखेडे यांचा भाजपात प्रवेश

शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या प्राची पाचखेडे यांचा भाजपात प्रवेश

100

हिंगणघाट :–

विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन हिंगणघाट शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या, योगशिक्षिका व समाजसेविका प्राची प्रसाद पाचखेडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

या प्रसंगी आमदार समीर कुणावार, भाजपा ज्येष्ठ नेते किशोर दिघे, जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकुर, जिल्हा उपाध्यक्षा छायाताई सातपुते, माजी नगराध्यक्ष प्रेमबाबू बसंतानी, निलेश ठोंबरे, तसेच भूषण पिसे, संजय माडे, विनोद विटाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार कुणावार यांनी प्राची  पाचखेडे यांना भाजपाचा शेला देऊन पक्षात स्वागत केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी पक्षाचे ध्येयधोरण समाजात रुजविण्याचे आवाहन यावेळी केले.