Home महाराष्ट्र प्रतिपंढरी घोराड येथे आषाढी निमित्त भाविकांची मोठी गर्दी 

प्रतिपंढरी घोराड येथे आषाढी निमित्त भाविकांची मोठी गर्दी 

285

दर्शनासाठी लागल्या रांगा

सेलू :–

विदर्भाची प्रतीपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र घोराड येथे आषाढी एकादशी निमित्त पहाटे पासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या यामुळे मंदिर परिसर भाविकांचे गर्दीने फुलून गेला होता.

येथे आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहाटे मुर्तीचे अभ्यंगस्नान महापूजा आरती करण्यात आली येथे सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची वर्दळ सुरू होती दिवसभर येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती दुपारी एक वाजता परंपरेनुसार मंदीरातून दिंडी निघाली हरीनामाचा गजर करीत दिंडी संपूर्ण गावाला प्रदशिणा घालीत मंदिर परिसरात आली यात गावातील भजनी मंडळीचा सहभाग होता दरवर्षी आषाढी एकादशीला परंपरेनुसार मंदीरातून ही दिंडी काढण्यात येते संपूर्ण गावाला या दिवशीला दिंडीची प्रदक्षिणा असते दुपारी चार वाजता दिंडी मंदिराजवळ येताच या दिंडी सोहळ्याची सांगता झाली त्यानंतर भाविकांना प्रसाद तथा फराळाचे वाटप करण्यात आले दिवसभर दर्शनासाठी भाविकांची वर्दळ, मंदीरातून गाव प्रदक्षिणा करता निघालेली दिंडी हरिनामाचा होणारा गजर पाहता हा मंदिर परिसर भाविकांचे गर्दीने फुलून गेला होता येथे आषाढी एकादशी निमित्त आलेल्या भाविकांसाठी परिसरात सेलूतील खोडे परीवार तथा तरूण युवक मंडळीचे वतीने फराळाचे वितरण करण्यात आले.

हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक 

आषाढी एकादशी आणि मोहरम एकाच दिवशी असल्याने आणि येथे परिसरात मंदीराचे प्रवेशद्वारावर गावातील सवारी नाचत असल्याने येथे हा सोहळा हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक दिसून आले येथे इतर दिवशी मोहरम मध्ये गावातील तसेच बाहेरगावातील सवारी मंदिराचे प्रवेशद्वारावर नाचायला येतात हे विशेष