Home वर्धा विठु नामाच्या गजरात रंगली सिंदीनगरी

विठु नामाच्या गजरात रंगली सिंदीनगरी

159

आषाढी एकादशीला सिंदी (रेल्वे) दुमदुमली

महिला भजनी मंडळाचा उत्स्फूर्त सहभाग

सिंदी (रेल्वे) :–

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त आज शहराच्या विविध भागांतून टाळ मृदंगाच्या गजरात, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन महिला व पुरुष भजनी मंडळींनी दिंड्यांसह भाग घेत विठु नामाच्या गजरात अवघी सिंदी नगरी रंगुन पंढरपूर अवतरल्याचे वातावरण निर्माण झाले.

शहरातील प्रत्येक दिंडीत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती, हे विशेष

शहरातील नंदा नदीच्या तिरावरील सार्वजनिक विठ्ठल रुक्मिणी मंदीर तसेच कोष्टी पुऱ्यातील वार्ड न. ११ तील सार्वजनिक विठ्ठल रुक्मिणी मंदीर आणि वार्ड न. १ मधील पोष्ट कार्यालयाजवळील सार्वजनिक विठ्ठल रुक्मिणी मंदीर अशा तीन्ही शहरातील मंदीरात पहाटे मान्यवरांच्या हस्ते विधीवत अभिषेक, अभ्यंग स्नान, धुप आरती, पुजन करण्यात आले. सकाळीपासुन या मंदीरात दिवसभर दर्शनासाठी भावीकांची प्रचंड गर्दी केली होती. सोबतच भजन, कथा वाचन, प्रसाद वाटप सारखे सुरु होते.

Oplus_131072

शहरातील अनेक मंदीरातुन असंख्य महीला-पुरुष भजन मंडळांच्या सहभागाने दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली.हि दिंडी शहरातील प्रमुख मार्गावरून फिरत आप आपल्या मंदीरात समारोप झाली. शहरात ठिकठिकाणी भावीकांनी दिंडीचे पुजन करुन अल्पोहाराचे प्रसादाचे वाटप करण्यात आले.

दिंडीतील महीला भजनीं मंडळाचा सहभाग लक्षणीय होता. डोक्यावर तुळसी, विवीध संतांच्या वेशभुषेतील चिमुकले आणि टाळ मृदुंगाच्या गजरात विठु नामाच्या गजराने संपूर्ण शहर विठ्ठलमय झाले होते. शिवाय विठ्ठल भक्तीत महीलानी घातलेली फुगडी, नृत्य सिंदीकरांचे लक्ष वेधुन घेत होते.