
भाविकांचे उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव साजरा
सेलू :–
विदर्भाची प्रतीपंढरी श्रीक्षेत्र घोराड येथे श्री संत केजाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मध्ये संगीतमय रामायण कथेचे आयोजन करण्यात आले आहे रविवार ता ११ पासून येथे श्री राम कथा ज्ञानयज्ञ सप्ताहास प्रारंभ झाला असून मंगळवारी ता 13 ला श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती
किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला या गाण्यावर भाविकांचा उत्साह आणि प्रभू रामचंद्र भगवान की जय च्या जयघोष पाहता येथील वातावरण भक्तिमय झाले होते
कितना पियो जाम पे जाम रातको पिया सुबह उतर जाता है, लेकीन एक बार पियो हरीनामका प्याला जिंदगी सवर जाती है प्रत्येकाने सात्विक आहार घेतला पाहिजे असा उपदेश हभप आळंदी येथील विश्वभंर महाराज माळोदे यांनी या कथेच्या माध्यमातून केला
अयोध्या आये मेरे राम बोलो जय जय श्रीराम म्हणत यात संतोषमामा यांनी सादर केलेली झाकी अनेकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली शनिवारी ता १७ पर्यंत या संगीतमय रामायण कथेची येथे सांगता होणार आहे





