Home वर्धा घोराड येथे संत केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव; संगीतबद्ध प्रवचनाचे आयोजन

घोराड येथे संत केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव; संगीतबद्ध प्रवचनाचे आयोजन

186

घोराड येथे श्री संत केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरा होणार

सेलू :

घोराड येथे श्री संत केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हा धार्मिक व आध्यात्मिक सोहळा भक्तिभावाच्या वातावरणात साजरा होणार आहे. यंदा या पुण्यतिथी महोत्सवाचे ११९ वे वर्ष असून परिसरातील भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

या निमित्ताने शनिवार, दि. १७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ ते १० वाजेदरम्यान संगीतबद्ध प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात श्रीमद् भागवत कथा वाचक व संत सेवक श्री. नागेश महाराज देशमुख (शेगाव, बुलढाणा) हे आपल्या अमृतवाणीने संतसेवा, भक्ती परंपरा, उपासना, निष्ठा व दर्शनासह वैकुंठमय (संगीतमय) प्रवचनाद्वारे भाविकांना मार्गदर्शन करणार आहेत.

हा कार्यक्रम श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान, घोराड येथे संपन्न होणार असून गावासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन अशोक येळणे व विठ्ठल वानोडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. सहकार्य म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान कमिटी, घोराड, श्री संत केजाजी महाराज हरिपाठ मंडळ, श्री संत केजाजी महाराज सेवा मंडळ तसेच समस्त ग्रामवासी घोराड यांचे मोलाचे योगदान लाभत आहे.

संत परंपरेचा वारसा जपणारा हा पुण्यतिथी महोत्सव भक्ती, सेवा व अध्यात्माचा सुंदर संगम ठरणार असून भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.