Home स्थानिक बातम्या आज केळझर येथे सुफी संत हजरत पीरबाबा दर्गाह यांचा उर्स मुबारक

आज केळझर येथे सुफी संत हजरत पीरबाबा दर्गाह यांचा उर्स मुबारक

217

सेलू :–

तालुक्यातील केळझर पेथील हजरत पीरबाबा दर्गाह कमिटीद्वारे उर्स मुबारक बुधवार दि. ३१ डिसेंबर रोजी सर्व धर्म समभाव असलेल्या संत हजरत पीरबाबा दर्गाह उर्फ टेकडिवाले बाबा यांचा उर्स मुबारक साजरा करण्यात येत आहे.

या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून केळझरवासींयाकडून शाही संदल निघणार आहे.

या कार्यक्रमाला परिसरातील व गावांतील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे.

महाप्रसाद व च्यादर चढविण्याला सायंकाळी ५ वाजता सुरुवात होणार आहे.

भाविकांनी महाप्रसाद घेण्याचे आवाहन हजरत पिरबाबा अली दर्गाह समितीच्या वतीने करण्यात आले आहे. गावातून ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच टेकडीवर भाविकांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष डॉ. ईर्शाद शेख, उपाध्यक्ष करिम शेख, सचिव इम्रान सैय्यद व कमेटिने केले आहे.