
सेलू :–
घोराड सेलू येथील माहेर शांतीनिवास मध्ये लुसी कुरियन दीदी संस्थापिका माहेर संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक अपंग दिवस साजरा करण्यात आला यात ३० अपंग बांधवांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमाला प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील मिश्रा, अमित ढगे तलाठी ग्राम महसूल अधिकारी सेलू पत्रकार संजय धोंगडे, प्रकाश कोठावळे सामाजिक कार्यकर्ते माहेर संस्था पुणे अतुल शेळके प्रकल्प प्रमुख माया शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. 
अपंग हा शरीराने अपंग असला तरी तो मनाने खंबीर पाहिजे असे अमित ढगे तलाठी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले कार्यक्रमाचे स्वरूप प्रकाश कोठावळे यांनी सांगितले माहेर संस्था ही मानसिक अपंग लोकांसाठी काम करते अपंगाच्या व्यथा काय असतात हे संस्थेने जवळून पाहिले आहे त्यामुळे अपंगांना मदतीचा हात आपण देऊ शकतो हा या कार्यक्रमाचा हेतू होता संस्थेची माहिती अतुल शेळके यांनी दिली जागतीक अपंग दिनानिमित्त अपंग बांधवाना प्रमुख अतिथीचे हस्ते साहीत्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद काटवे यांनी केले तर साहिल दूधबडे यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमासाठी माहेर संस्थेचे कार्यकर्ते दिपाली भलावी, सुरज ढोले यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी सर्व अपंग बांधवांना माहेर शांतीनिवास केद्राचे वतीने जेवण देण्यात आले.





