Home वर्धा कोटंबा ग्राम पंचायत मध्ये दिव्यांग बांधवाना पाच टक्के टक्के निधीचे वाटप

कोटंबा ग्राम पंचायत मध्ये दिव्यांग बांधवाना पाच टक्के टक्के निधीचे वाटप

80

सेलु :–

कोटंबा ग्राम पंचायत मध्ये दिव्यांग बांधवांसाठी विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून ग्रामपंचायत खंडातील पाच टक्के निधी वाटप कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत प्रशासक नंदनवार उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती पाणलोट समितीच्या अध्यक्षा व माजी सरपंच रेणुका कोटंबकार, ग्रामसेवक भगवान कंठाळे, उपस्थिती होते.

दिव्यांग बांधवांना सन्मानपूर्वक त्यांच्या हक्काचा पाच टक्के निधी पद्धतीने वाटप करण्यात आले. अनेक लाभार्थ्यांना आरोग्य, आणि दैनंदिन गरजांसाठी हा निधी त्यांना आर्थिक मदत देणारा ठरणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

ग्रामपंचायत दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असून शासकीय योजनांचे मार्गदर्शन, प्रमाणपत्र प्रक्रिया, आर्थिक सहाय्य, पेन्शनसारख्या उपक्रमात ग्रामपंचायत सक्रियपणे सहकार्य करत असते.ग्राम पंचायत कर्मचारी सूरज भोंगाडे,सविता सरोकार, राकेश कांबळे, यांचे सहकार्य लाभले.