Home वर्धा श्री. संत केजाजी कॉन्व्हेन्ट येथे चिमुकल्यांचे स्वागत

श्री. संत केजाजी कॉन्व्हेन्ट येथे चिमुकल्यांचे स्वागत

189

सेलू :–

नजीकच्या श्री. संत केजाजी प्री. प्रायमरी स्कूल घोराड येथे चिमुकल्यांचे पहिल्या दिवशी शाळेचे संस्था संचालक तथा मुख्याध्यापक प्रशांत झाड़े यांनी पुष्प गुच्छ तसेच स्वीट वस्तु देत स्वागत केले. फोटो स्टँड वर शाळेत उपस्थित असणाऱ्या सर्वच चिमुकल्यांचे फोटो काढण्यात आले तसेच शाळेत विविध उपक्रम घेत चिमुकल्यांचे मनोरंजन करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती ही मोठ्या प्रमाणात होती. यावेळी शाळेच्या शिक्षिका चैताली धर्मे, करिश्मा तेलरांधे मदतनीस आरती भुरे उपस्थित होत्या.