Home वर्धा बँडपथक वाजवीत पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांचे स्वागत 

बँडपथक वाजवीत पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांचे स्वागत 

171

घोराड येथील यशवंत विद्यालयात बँडपथक वाजवीत पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांचे स्वागत 

सेलू :–

तालुक्यातील घोराड येथील यशवंत विद्यालयात पहिल्याच दिवशी नवागतांचे बँड पथक वाजवित पुष्षवृष्टी करुन येथे स्वागत करण्यात आले.

विदर्भात आज शाळेची घंटा वाजली असून शासनाच्या निर्देशानुसार पहिल्याच दिवशी शाळामध्ये विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले येथील यशवंत विद्यालयात रांगोळी काढून रस्त्याची सजावट करण्यात आली होती येथे इयत्ता पाचवीत दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रवेशद्वारावर बँडपथक वाजवीत पुष्षांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आले त्यानंतर आयोजित कार्यक्रमात पुष्पगुच्छ देऊन शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला शाळेची मुख्याधयापक मिलींद अहेर, पुण्यनगरी चे तालुका प्रतिनिधी संजय धोंगडे, जेष्ठ शिक्षीका एस डी गावंडे ,नव्यानेच रूजू झालेल्या शिक्षिका माधुरी एकापुरे ,पालक प्रतिनिधी सौ तेलरांधे, कोल्हे, भैरमताई यांची येथे प्रमुख उपस्थिती होती विद्यार्थी हा शाळेचा आत्मा आहे त्यांना चांगले शिक्षण मिळावे त्यांचा शाळेची ओढ असावी या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविला जात असून विद्यार्थ्यांनी दररोज शाळेत उपस्थित राहून चांगले शिक्षण घ्यावे असे मत मान्यवरांनी व्यक्त केले याप्रसंगी मुख्याधयापक मिलींद अहेर, शिक्षीका एस डी गावंडे, एकापुरे, पत्रकार संजय धोंगडे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर वर्गखोलीत प्रवेश देत विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षीका एल एच काकपुरे यांनी केले तर ए एम कोल्हे यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाला बी सी आडे, किर्ती एम मिसाळ, शिक्षकेतर कर्मचारी पी एस गोडे, यु पी सावळे, माधुरी काळे, गोपाल सरनाईक तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.