Home घडामोडी सेलू शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले; संत जगनाडे महाराज जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावाने

सेलू शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले; संत जगनाडे महाराज जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावाने

140
oplus_0

सेलूत श्री संत जगनाडे महाराज जयंती उत्सव उत्साहात साजरी

पालखी व दिंडी सोहळ्याने वातावरण भक्तिमय 

सेलू :–

येथील वडगाव रोड स्थित श्री संत संताजी जगनाडे महाराज मंदिरात संत जगनाडे महाराज जयंती उत्सव तथा श्री विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठा दिवसानिमित् सोमवारी ता ८ ला दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यात परिसरातील तथा बाहेरगाववरून आलेल्या ८१ भजनी दिंड्याचा सहभाग होता सकाळी११ वाजता दिंडी सोहळ्याला सुरवात झाली हरिनामाचा जयघोष करीत पालखी व दिंडी सोहळ्याने सेलूतील वातावरण भक्तिमय झाले होते मंदिरातून निघालेली दिंडी पालखी चे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले या दिंडी सोहळ्यानिमीत्त सेलूतील प्रमुख मार्गावर रांगोळ्या काढून सजावट करण्यात आली होती टाळ मृदंगाचा गजर करत पायदळ दिंडी प्रमुख मार्गाने मार्ग क्रमण करीत मंदिरात पोहचल्यानंतर याची येथे सांगता झाली त्यानंतर गुरूवर्य हभप शांताराम महाराज जामुनकर यांचे गोपाल काल्याचे किर्तन झाले.

संताजी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित संत जगनाडे महाराज देवस्थान मध्ये श्री संत जगनाडे महाराज जयंती उत्सव दरवर्षी साजरा केला जातो यावेळी दिंडी सोहळ्यात सहभागी होणार्‍या भजनी दिंड्याचा प्रमुख अतिथीचे हस्ते सन्मान करण्यात आला तसेच प्रमुख दानदाते तथा मान्यवर पाहुण्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, काँग्रेसचे नेते शैलेश अग्रवाल, माजी जि प सदस्य राणा रणनवरे, अशोक कलोडे, संजय झाडे यांची प्रमुख उपस्थिती होती

या कार्यक्रमाचा शेवट भाविकांना महाप्रसादाचे वितरण करून करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजनासाठी संतांजी चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष मनोहर सोमनाथे, व पदाधिकारी अनिल देवतारे, डॉ केशव लोणकर, मनोहर वाघमारे, संजय धोगंडे, धनराज समर्थ, मिलींद सोमनाथे, महादेव वांदिले, राजेंद्र दंढारे, भास्कर दंढारे, विठोबाजी लाडेकर, विजय खोडे, विनोद शिंदे, शामरावजी शेंडे, नरेश वांदीले, रविद्र आदमने, भगवान तितरे आदीनी सहकार्य केले.