
सेलू :–
येथील तहसील कार्यालयात गुरूवार ता. ३ रोजी शासनाच्या निर्देशानुसार १३ जून २०२५ ते १२ जून २०३० या कालावधीकरीता तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाकरिता नव्याने आरक्षण सोडत काढण्यात आली यात अनुसूचित जाती व जमाती वगळता ना. मा. प्र. व सर्वसाधारण गटाकरीता हे आरक्षण काढण्यात आले यात अनुसूचित जाती करीता ८, अनूसूचीत जमाती करीता ९, नामाप्र १७ तर सर्वसाधारण गटाकरीता २८ ग्रामपंचायती राखीव आहे.
अनुसूचित जातीमध्ये वडगाव कला, धानोली मेघे, हिंगणी, रेहकी कला तर मोई, जामणी, आमगाव, खडकी, गरमसूर या महिलाकरीता राखीव ठेवण्यात आल्या आहे तर अनुसूचित जमाती मध्ये चानकी, हमदापूर, खैरी कामठी, घोराड तर टाकळी, झडशी, पळसगाव बाई, क्षीरसमुद्र, येळाकेळी, टाकळी किटे येथे या महिलाकरीता राखीव आहे.
तसेच नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सुरगाव सेलडोह, वडगाव जंगली, अंतरगाव, जयपूर, कोपरा, सालई पेवठ, बाभुळगाव, तर सालई कला, नानबर्डी, बोरी (कोकाटे), हेलोडी, जुवाडी, दिदोंडा, बोंडसुला, बोरखेडी (कला), रिधोरा या महिला करीता राखीव आहे. तर सर्वसाधारण गटाकरीता सुकळी बाई, आकोली, खापरी, कोलगाव, वघाळा, कान्हापूर, वडगाव खुर्द, तळोधी, वाहितपुर, खडका, देऊळगाव, केळझर, झडशी, खापरी ढोणे, आमगाव, मदनी तर गिरोली (ढगे), रमणा ऐनकापूर, नवरगाव, दहेगाव गोसावी, दीग्रज, सोंडी, कोटंबा जुनगड, जुनोना, पिंपळगाव, चारमंडळ, आलगाव, महाबळा, सुकळी (स्टेशन) या महिला करीता राखीव आहे. तहसील कार्यालयात तहसीलदार मलीक विराणी यांचे प्रमुख उपस्थितीत गितांशी राऊत या पाच वर्षीय मुलीचे हस्ते ईश्वरचिठ्ठी काढून हे आरक्षण काढण्यात आले यावेळी विविध राजकीय पक्षाची पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.





