Home Breaking News पत्नीला मुलासह गावाकडे घेऊन जात असताना रस्त्यातच गळा दाबून खून; आरोपी अटकेत

पत्नीला मुलासह गावाकडे घेऊन जात असताना रस्त्यातच गळा दाबून खून; आरोपी अटकेत

309

सेलू :–

दिड दोन वर्षापासून मुलासह माहेरी असलेल्या पत्नीस मुलासह गावाकडे परत येताना पतीने तिचा रस्त्यातच गळा दाबून खून केला व प्रेत मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील अमरवाडा पो स्टे च्या हद्दीतील पेंच नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे याप्रकरणी चौकशीची चक्रे वेगाने फिरवित आरोपीस अटक केली आहे अक्षय देवराव चोरपगार वय 27 वर्ष राहणार गोळेगाव ता दर्यापूर जि अमरावती ह मु मोर्चापुर असे आरोपीचे नाव आहे

मृतक प्रणीता ही दिड दोन वर्षापासून दाताळा मुर्तीजापूर येथे माहेरी होती तिला दोन वर्षाचा मुलगा आहे तिचा पती हा तिला घेण्याचे बहाण्याने माहेरी दि 22 रोजी कारने आला होता त्या दिवशी तिथे त्याने मुक्काम केला दुसरे दिवशी दि 23 ला सकाळी नऊ वाजता चे सुमारास त्याचा मुलगा पत्नीसह त्याचे गावाला मोर्चापुर येथे येत असताना केळझर गावाजवळ आरोपीने मृतक पत्निसोबत भांडण करून तिचा वाटेतच गळा दाबून खून केला त्यानंतर मृतकचे नातेवाईकांनी त्याचेकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल केली त्याने पत्नी बेपत्ता असल्याबाबत पो स्टे सोनेगाव नागपूर शहर येथे मिसिंगची तक्रार दाखल केली होती सदर गुन्ह्यातील पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने त्याचेच कारने मृतकचे प्रेत पो स्टे अमरवाडा जि छिंदवाडा मध्यप्रदेश हद्दीतील पेंच नदीत फेकून दिले त्याबाबत तेथे दि 24 मार्च रोजी मर्ग नोंद आहे तिथे तिचे प्रेत दफनही करण्यात आले होते त्यानंतर मृतकचे नातेवाईकांनी आरोपींकडे गावात जाऊन चौकशी केली असता आरोपींने त्याचे पत्नीचा गळा दाबून खून केल्याचे सांगितले याबाबत रोशन विश्वास चक्रे वय 27 रा दाताळा, मुर्तीजापूर जि अमरावती यांनी सेलू पोलिसांत फिर्याद दाखल केली पोलिसांनी लागलीच याची दखल घेत पोलिस पथक व इतर मृतकचे नातेवाईकांनी पो स्टे अमरवाडा येथे जाऊन मृतकच्या प्रेताची पाहणी करून तिची ओळख पटविली व तिचे अत्यविंधीकरीता माहेरकडील नातेवाईकांच्या ताब्यात दिले फिर्यादीचे रिपोर्ट वरून सेलू पोलिसांनी कलम 103(1) 238,240बिएन एस नुसार गुन्हा नोंदविला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे पुढील तपास ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रितम निमगडे, पोहवा श्रावण ठाकरे करीत आहे.