Home Breaking News पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची एकनाथ चौधरी यांच्या निवासस्थानी सांत्वनभेट

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची एकनाथ चौधरी यांच्या निवासस्थानी सांत्वनभेट

271

सेलू : –

व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ चौधरी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मातोश्री सौ. मुक्ताबाई रामदासजी चौधरी यांचे बुधवार, दि. 3 डिसेंबर रोजी पहाटे सावंगी मेघे येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. श्वसनाचा त्रास तीव्र झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

या दुःखद प्रसंगात वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मानवी संवेदनांचा उच्चांकी आदर्श ठेवत आज, शनिवार दुपारी चार वाजताच्या सुमारास सेलू येथील चौधरी यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांनी दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण केली आणि चौधरी कुटुंबियांना धीर देत सांत्वनपर शब्दांनी आधार दिला.

चौधरी परिवारावर आलेल्या या दुःखाच्या काळात विविध राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरही सतत संपर्कात राहून सहवेदना व्यक्त करीत आहेत.

याप्रसंगी भाजपचे जिल्हा महामंत्री अशोक कलोडे, तालुका अध्यक्ष प्रफुल्ल खोडे, शहराध्यक्ष ओमदेव सावरकर, पृथ्वीराज शिंदे, संकेत बारई,  उपस्थित होते.