Home वर्धा नागरीकांनी मंडळ स्तरावर आयोजित शिबिराला उपस्थित राहून शासकीय योजनाचा लाभ घ्यावा –...

नागरीकांनी मंडळ स्तरावर आयोजित शिबिराला उपस्थित राहून शासकीय योजनाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वान्मथी सी 

129

हिंगणी येथे समाधान शिबीराचे आयोजन 

सेलू :–

शासनाचे वतीने मंडल स्तरावर आयोजित शिबिराला उपस्थित राहून नागरिकांनी शासकीय योजनाचा लाभ घ्यावा- असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले या योजनेचा लाभ शेतकरी, शेतमजूर यांना देऊन प्राप्त तक्रारीचे निराकारण करून शिबीर खऱ्या अर्थाने यशस्वी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी उपस्थित सर्व विभागाचे अधिकार्‍यांना दिले.

जनतेच्या प्रश्नांचे त्वरीत निराकरण करण्यासाठी महसूल विभागाचे वतीने हिंगणी येथील मुडे सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान टप्पा एक या शिबीराचे शनिवारी ता 7 ला आयोजन करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या.

या शिबीराचे उदघाटन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांचे हस्ते पार पडले यावेळी हिंगणी येथील सरपंचा दामीनी डेकाटे, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे ,तहसीलदार शंकुतला पाराजे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष अशोक मुडे, भूमी अभिलेख विभागाचे उप अधिक्षक दिलीप गर्जे, नायब तहसीलदार मधुकर ठाकरे, कलिंगकुमार किरसान, राजेंद्र मंथनवार, कृषी अधिकारी माहुले, यांची प्रमुख उपस्थिती होती यात विविध विभागाशी संबधीत योजना व सेवांचा लाभ नागरीकांना एका छताखाली देण्यात आला सदर शिबिरामध्ये उपस्थित विवीध विभागाशी संबंधित सर्व योजना अंतर्गत 1561 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला सदर शिबिरामध्ये आरोग्य विभागामार्फत तपासणी कँम्प द्वारे 132 लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली यात बचत गटाचे सक्षमीकरण करण्याकरीता महिला बचत गटाचे स्टाँल लावण्यात आले होते जिल्हाधिकारी यांनी यावेळी सर्व स्टाँलची पाहणी केली यावेळी उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, अशोक मुडे यांनी मार्गदर्शन केले तहसिलदार पाराजे यांनी आपल्या प्रास्ताविकातून शिबिराचे वेळापत्रक व सदर शिबिरामध्ये देण्यात आलेल्या विविध विभागाचे योजना व लाभाची माहीती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ अधिकारी रमेश भोले यांनी केले शिबीराला नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाला सर्व मंडळाचे मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल कर्मचारी, पोलिस पाटील, व तालुक्यातील दहा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.