Home वर्धा ५ लाखांचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने नष्ट

५ लाखांचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने नष्ट

192

पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई

सेवाग्राम :–

जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या प्रलंबित गुन्ह्यांतील मुद्देमाल कायदेशीररित्या नष्ट करण्याबाबत पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली. त्या अनुषंगाने सेवाग्राम पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये दाखल गुन्ह्यांतील मुद्देमाल नष्ट करण्यासाठी सक्षम न्यायालयाकडून आदेश प्राप्त करण्यात आले.

न्यायालयाच्या आदेशानुसार व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परवानगीने सेवाग्राम पोलीस ठाण्यातील एकूण ३४ गुन्ह्यांमधील प्रलंबित मुद्देमाल आज नष्ट करण्यात आला. या कारवाईत सुमारे ५ लाख ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

ही विशेष मोहीम पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतुरकर, पोउपनि वाडिवा, बाबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अखिलेश यशपाल, पोहेकॉ हरिदास काकडे, चोपोहेकॉ विलास लोहारकर यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक डी. वाय. राऊत, निरीक्षक व संपूर्ण स्टाफ उपस्थित होता.

अवैध दारूविक्री व अंमली पदार्थांच्या विरोधात प्रशासनाची कारवाई पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.