Home Breaking News हिंगणी रोडवर दुचाकी ची दुचाकीला धडक, एक ठार चार जखमी 

हिंगणी रोडवर दुचाकी ची दुचाकीला धडक, एक ठार चार जखमी 

920

सेलू :–

हिंगणी बोरधरण मार्गावर किन्ही शिवारात दोन दुचाकी वाहनाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर अन्य चार जण जखमी झाल्याची घटना सोमवारी ता २६ ला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान घडली

सोमवारी २६ जानेवारी असल्याने बोरधरण कडे जाणार्‍या वाहनाची संख्या अधिक असते त्यातच काही तरूण भरधाव वेगाने वाहन चालवतात यामुळे या मार्गावर अपघाताचा धोका असतो अशातच बोरधरण कडे आपल्या दुचाकी वाहन क्रमांक एम एच ३२ बीए ८७९६ ने तिघे जात असताना समोरून हिंगणीकडून येणार्‍या दुचाकी वाहन क्रमांक एम एच ३१ एव्ही ९८८४ ने जबर धडक दिल्याने यात अक्षय विलास येरखेडे वय २३ कारला वर्धा यांचे निधन झाले तर त्याचे सहकार्यासह दुसऱ्या दुचाकी वरील तिघे असे चार जण जखमी झाले जखमीमध्ये वैष्णवी पडाल वय २०, सुजल मोहीजे वय २४, निखिता मोहीजे वय २७, ओमप्रकाश वठ्ठी वय ३७ यांचा समावेश आहे घटनेची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेने उपचारासाठी सेलूचे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.