Home वर्धा राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची ४२८ वी जयंती उत्साहात

राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची ४२८ वी जयंती उत्साहात

79

वर्धा :–

स्वराज्य जननी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची ४२८ वी जयंती वर्धा येथील जिजाऊ स्मारकस्थळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जय जिजाऊ, जय शिवराय च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यावेळी नव-निर्वाचित नगराध्यक्ष डॉ. सुधीर पांगुळ, छत्रिय मराठा समाज संस्था, अखिल भारतीय मराठा महासंघ तसेच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्यास व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस विधीवत पूजन करून हारार्पण केले.

राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी बाल शिवरायांच्या मनात स्वराज्याची संकल्पना रुजवून रयतेच्या स्वराज्याचा पाया घातला. पातशाही व्यवस्थेचे घातक स्वरूप ओळखून त्यांनी शिवरायांना संस्कार, धैर्य व स्वराज्याचे स्वप्न दिले. त्यांच्या त्याग, बलिदान व कर्तृत्वामुळेच स्वराज्य साकार झाले, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कर्ला येथील इयत्ता पाचवीतील योगिता सुविर कुमरे व स्वरा संदीप गजबे यांनी प्रभावी भाषणे केली. यावेळी नगराध्यक्ष डॉ. सुधीर पांगुळ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी संदीप भांडवरकर, नितीन शिंदे, प्रा. उमाकांत डुकरे, राजेश वाकडे, सुनील पाटनकर, बाळा माऊसकर, प्रा. राजेंद्र साळुंके, सुनील खराडे, तुषार देवढे, रमेश इंगळे, राजेश वानखेडे, अमोल वाघ, तुकाराम पवार, आशिष जाचक, शरद रणनवरे, डॉ. अशोक चोपडे, नंदकुमार वानखेडे, महेश मुधोळकर, अ‍ॅड. अभय शिंदे, प्रा. सुनील अंभोरे, श्रीकांत अहेरराव आदी उपस्थित होते.तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्षा शैलजा साळुंके यांच्यासह भारती चांदुरकर, भाग्यश्री निघडे, प्रतिभा माऊसकर, नीता भांडवलकर, कीर्ती सोलंकी, जया जाधव, देवयानी वानोडे, समृद्धी आदमने, सुनीता डुकरे, अर्चना देवढे व संजीवनी कानसकर यांनी उपस्थिती लावली.