Home Breaking News सेलू नगरपंचायतीचा भोंगळ कारभार ; एकाच जाहीरातीचे दोनदा काढले धनादेश 

सेलू नगरपंचायतीचा भोंगळ कारभार ; एकाच जाहीरातीचे दोनदा काढले धनादेश 

205

कर्मचार्‍यांचे उध्दट वर्तणूकीने अनेक त्रस्त 

सेलू :–

सेलू नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा फटका अनेकांना बसत असून येथे एकाच जाहीरातीचे दोनदा धनादेश काढल्याने अंकाऊट विभागाचे कार्यप्रणाली बाबत संभ्रम निर्माण होत आहे तसेच येथे कामासाठी गेलेल्यांना या कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या उद्धट वर्तणूकीमुळे अनेकांना आगाऊचा मनस्ताप सहन करावा लागत आहे

सध्या या नगरपंचायतला कुणीही वाली राहीला नसून कर्मचारी मनमानेल तसे वागतात त्यांचे मनमानी कारभारामुळे अनूक जण त्रस्त झाले आहे येथे कार्यालयात नियमीत मुख्याधिकारी सेलू यांची उपस्थिती नसते याबाबत तक्रार करायची झाल्यास कुणाकडे दाद मागावी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे येथे कर्मचारी कार्यालयात कमी आणि बाहेर जास्त असतात येथे कार्यालयात कामानिमित्त गेलेल्या सभ्य व्यक्तीस सौजन्याची वागणूक मिळत नाही कामासाठी आलेल्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांना परतून लावले जाते कर्मचाऱ्यांचे या अशा वागण्यामुळे अनेकांना कामासाठी वारंवार या कार्यालयाचे उबंरठे झिजवावे लागत आहे येथे पत्रकारांशी या कर्मचाऱ्यांशी वागणूक चांगली नसून येथील नगराध्यक्षाला हे कर्मचारी जुमानत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले यामुळे या कर्मचार्‍यांशी अशी वर्तणूक पाहता त्यांनी मनमानीचा कळस गाठला आहे कामासाठी आलेल्यांना अपमानीत करण्याचा अधिकार कुणी दिला असा सवाल उपस्थित केला जात आहे एकदंर परिस्थिती पाहता नगरपंचायतचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असून जनता मात्र याला कमालीची वैतागली आहे या अशा कारभारामुळे नगरपंचायत प्रती लोकांत अंसतोष निर्माण होत आहे शासनाने तथा वरिष्ठांनी याची दखल घेत या अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर वेळीच कारवाई करून जनतेची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी केली जात आहे.